प्रिय सोना असेच आपले संसाराचे दिवस चालू होते कधी अडचणी तर कधी त्यातून मार्ग काढायची खुशी..घरासाठी सगळीकडून कर्ज काढल्याने आर्थिक अडचणी चालूच असायच्या मी माझे दहा बारा तोळ्यांचे सर्व सोन्याचे दागिने आपले घर तयार होत होते तेव्हा आर्थिक अडचणी मुळे विकून टाकले होते ते पैसे घरासाठी वापरले होतेहे माझं आपल्या संसारासाठी छोटेसे योगदान होते त्यात माझी काही वेगळी प्रौढी नव्हती तुला मात्र त्याचे खूप कौतुक आणि अप्रूप वाटले होते तू म्हणालास बायका नवऱ्याच्या मागे लागून नवीन नवीन सोन्याचे दागिने बनवतात तू मात्र आहे ते दागिने विकायला तयार झालीस पुढील काळात जरा बरी परिस्थिती झाली की मी तुझे सगळे दागिने तुला परत नव्याने करून देईन मी फक्त हसले होते कारण असेही मला सोन्याच्या