कोकणातले भोरपी - भाग 3

  • 66

कोकणातले भोरपी  भाग 3           एखादं आयदण विणून ते पुंग़ळ्या नी ग़ोळ्या गुतवून उजू होईतो प्रचंड खटापट असते. हे अत्यंत किचकट नी वेळमोडं काम असतं. जाळी विणताना आटीचा धागा संपला की  त्याच्या टोकाला नव्या आटीतला धागा विशिष्ट पद्धतीची गाठ मारून जोडावा लागतो. कारण वापर करताना ती गाठ नडीला येता कामा नये. नायलॉनचा धागा वापरात येण्याआधी आंबाडी, ताग आणि किशिष्ट प्रक्रिया करून सुती दोरा चिवट करून तो वापरला जायचा. भोरपी आले त्यावेळी  वरच्या वाडीत सरवज्याच्या घराजवळ रस्त्यावर बांधलेल्या मोरीच्या विरुद्ध बाजूला पावसाळी पाण्याच्या व्हावटीमुळे पुरुषभर खोल कोंड होती. त्यात वीत भर लांबीचे पिंगट रंगाचे मासे  दिसायचे.  आमचा वाटेली,