प्रिय सोना..तुझा कोल्हापुरात असलेला दवाखाना बंद करण्याच्या formality पूर्ण करीत इकडे बदलीच्या गावी सोबत घेऊन जाण्याच्या सामानाची आवरा आवर तू सुरू केलीसलगेच हजर व्हायचे असल्याने थोडे तरी सामान घेऊन जायला लागणार होते राहायला घर मिळाल्यावर उरलेले संसाराचे सामान न्यायला लागणार होते माझ्यापेक्षा तुझीच गडबड जास्त चालली होती तुला एक उत्साह ही होता शिवाय मी माझ्या ट्रेनिंग कामात पुण्यात व्यस्त असल्याने वेळ देऊ शकत नव्हते तुझे प्रत्येक गोष्टीचे प्लॅनिंग उत्तम असायचे शिवाय पॅकिंग करण्यात तुझा हात कोणीच धरू शकत नव्हते तिकडे मुलगा सुन यांना पण तू कळवले होतेस पण ना त्यांना माझ्या प्रमोशनचे कौतुक ना माझ्या बदलीशी देणे घेणे आपली नाती हळूहळू वीसविशीत होत होती किती सावरायचं म्हणले तरी जमत