कोकणातले भोरपी - भाग़ ४दोन तुकड्याची साडी नेसलेल्या बाईने त्यातली बरीशी साडी उचलून आशाळभूत चेहेरा करीत म्हटले. “ मावशी , माजं ह्ये कापाड – नेसूचं लुगड अक्शी निमता पुरतं ऱ्हायलया बगा...... ह्ये कापाड म्यां घ्येतो , माजं दोन मोसम निभतील...... न्हाई म्हणू नुको . वाकळीच्या मजुरीस्नं झालं तरी पैसं कापून घिया........” त्यावर हसून आई म्हणाली, “अगो तीचा पदर विरला होता म्हणून तो फाडून टाकलाहे पुऱ्या लांबीचं नाहिये ते. ” क्षणाचीही उसंत न लावता मोठी भोरपिणी म्हणाली, “ तेला काय करणार, भण माजी बारकुड्या अंगाची हाय त्याला होईत बरोबर. आता अंगावर हा त्येच्या पक्षा जादा भरतंय .....”