️अभिजित ️5"गुरुजी"... हाताच्या मुठी घट्ट आवळत दात ओठ खात तो रागात कडाडला...मंत्र पठण करणाऱ्या गुरुजींनी मान तिरकी करत त्याच्या कडे पाहिले त्यांच्या ओठांतून आजून ही मंत्रांचे उच्चारण होत होते.... प्रतापला पाहून ही त्यांनी पूजा थांबवली नाही....आणी का थांबवतील?.. काय कारण?.. ती देविची पूजा होती... तेथे पहिल्या येणाऱ्या पालखीचा मान होता.. ती कोणत्या ही गावची असेना.. पूजा पहिल्या येणाऱ्या पालखीचीच होणार होती.. मान त्याच पालखीला मिळणार होता...तेथे प्रताप काय कोणाचीच मक्तेदारी चालणार न्हवती...गिरुजींनी लगेच पुढच्या आचमनाला सुरवात केली.."पण हे विक्रमला कोणी सांगावे रागाने लाल झालेला विक्रम पूजा उधळून दयायला गाभाऱ्यात शिरू लागला... पण त्याच वेळी गाभाऱ्याच्या समोर अभी उभा राहिला.... त्याला