विक्रम आणि वेताळ - जीवन अनेक प्रश्न चिन्हे - 4

विक्रम आणि वेताळ विणले जाळे २" राजा, थकलास तर थांबू या का? " आपल्या पांढऱ्या बटांशीखेळत वेताळाने  विचारले. पण राजा विक्रमादित्य काही न बोलता वाट चालत राहिला." राजा, तूझी चिकाटी अगाध आहे. पण ज्या साधू साठी तू मला घेऊन जात आहेस तो साधू नसून क्रूर तांत्रिक आहे. पण ठिक आहे....आता पुढची कहाणी ऐक....    " संतोष सासणे मृत्यू पावल्यावर सूमारे चार महिन्यांनी  मोहन परांजपे या वारणातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केली. हा नोंदणीकृत सरकारी बांधकाम ठेकेदार होता.जिल्ह्यातील अनेक बांधकामाचा...बंध-यांचा तो ठेकेदार होता.गेले काही वर्षे त्याला बरीच कामे मिळाली होती.पण मागचे दोन तीन महिने तो खूप विमनस्क अवस्थेत होता.तो सतत दडपणाखाली असल्यासारखा