फक्त तुझ्याच साठी - 8

️️फक्त तुझ्याचसाठी ️तेवढ्यात बाथरूमचं दार उघडलं...आणि केस टॉवेलने पुसत सई बाहेर आली."काय गं?""सकाळपासून कोणाचं कौतुक सुरू आहे?"गौरीने छाती पुढे काढली."माझंच."सईने हसत तिच्या गालावर हलकी चिमटी काढली."स्वतःचं कौतुक स्वतःच करणारी एकच व्यक्ती आहे या जगात...""आणि ती म्हणजे..."दोघी एकाच वेळी म्हणाल्या..."गौरी!"पुन्हा एकदा घरभर हसण्याचे आवाज घुमले...साधा पण अतिशय नेटका ऑफ-व्हाइट कुर्ता, निळी जीन्स,.. स्टेट केलेले केस व्यवस्थित क्लचर  मध्ये अडकवून तिने ओठांना लीप बाम लावला...बस झाला तिचा मेकअप...हातात फाईल आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास...ती इंटरव्हिव साठी तयार झाली ...मनात थोडी भीती होती... पण तरी ही ती स्वतःला शांत करत आरशासमोर उभी राहून तिने एक दीर्घ श्वास घेतला."ऑल द बेस्ट, सई...तू बेस्ट आहेस... आणी आजचा इंटरव्हिव