कोकणातले भोरपी - भाग 5

  • 99
  • 1

कोकणातले भोरपी- भाग ५      दुसरे दिवशी दोघीही वेळेवारी आल्या. आईने  दिलेली चहा चपाती खावून त्या कामाला लागल्या. पोरं अंगणात रेवे घेवून खेळायला लागली. मी शाळेतून आलो तेंव्हा बरच काम पुरतावत आलेलं होतं बारा वाजता  गोधड्या पुऱ्या झाल्या. “जुन्या फाट्लेल्या वाकळा  थांग़डायच्या असल्या तर दे मावशी” पोरगेली भोरपीण आईला म्हणाली.  जुन्या दोन तीन गोधड्या  एकदोन ठिकाणी  विरल्या होत्या. त्याना  फाटलेल्या   टीच भर वीतभर  ढिगळं मारून त्या धडावून झाल्यावर काम संपलं . आजही  आईने पुन्हा भाताचे ठाय लावून आणल्यावर भोरपीणी ओशाळून बोलल्या. “ मावशी, च्या  चपाटी  रग्गड झालती की . पुना आणी जेवाण कशा पायी..... ” जेवून  झाल्यावर  आई  हिशोबाची