अनुबंध बंधनाचे. - भाग 58

  • 195
  • 63

अनुबंध बंधनाचे.....( भाग ५८ )त्या दोघांचा हा प्रवास असाच पुढे चालु होता. अंजली सांगेल त्याप्रमाणे प्रेम गाडी चालवत होता. जवळपास तासभर हा अविस्मरणीय प्रवास करून ती त्याला वांद्र्याच्या त्याच हॉटेल जवळ घेऊन येते, त्या हॉटेलच्या पार्किंग मधे गाडी पार्क करून ते दोघे बाईक वरून उतरतात. हे तेच हॉटेल होते जिथे काही वर्षापूर्वी तिने त्याचा वाढदिवस साजरा केला होता. ते हॉटेल पाहून प्रेम थोडासा विचारात पडतो, त्याला असं पाहून अंजली बोलते...अंजली : प्रेम...! काय झालं...? नको जायला का आत...? प्रेम : असं काही नाही... चल...!अंजली : प्रेम...! नक्की ना...? तुझी इच्छा नसेल तर, कॅन्सल करू, आपण दुसरीकडे जाऊ कुठेतरी, तुला आवडेल तिथे. मला