कोकणातले भोरपी - भाग 6

  • 438
  • 105

कोकणातले भोरपी- अंतिम भाग ५गावातल्या जाणत्यानी  वाड्यात जावून तंडामुंडी केल्यावर घेतल्या किमतीत वीस रुपये कमी करून नव्याने सौदा ठरवून दुसरा बैल दिला.  तो मात्र वहिवाटला. त्याच दरम्याने  फणशात दहा भांगे जमिन घेवून  रुक्म्या  भोरपी  तिथे  स्थाईक झाला . त्याने तो पाडा  आपल्याकदे बाळगला. पावसाळी  शेती नी उन्हाळी फडक्यांचे माडा पोफळीचे आगर तो अर्धलीने करी.  तिथे  बैल रहाट ओढायचे काम बैल मुकाट्याने करी.  रुक्म्याकडे तो  वीस वर्षे  इमाने इतबारे जोत नी  बैल रहाट ओढायचे काम करी. पुढचे दात पडले नी  दाढा पडल्या  नी  बैल  रवथाचे बोळे टाकायला लागल्यावर रुक्म्याने तो  राधानगरीच्या  बाजारात खाटकाला  विकला.       अकरावी झाल्यावर  आम्ही कॉलेज शिक्षणासाठी