तुझ्यासाठी लिहिलेली कविताडायरीच्या एका कोपऱ्यात शांत,फक्त तुझ्यासाठी एक कविता निजलीये.तुझ्या एका संवादाच्या प्रतीक्षेत,ती शब्दाशब्दाने आतून भिजलीये.तिला नाही आवडत गर्दी जगाची,ती फक्त तुझाच एकांत मागते.तू वाचशील जेव्हा तिला हळूच,तेव्हा ती तुझ्याच सुरात जागी होते.त्यात संवादाचे काही मोकळे क्षण आहेत,आणि पुन्हा जुळलेल्या नात्याची ओढ आहे.तू दिलेल्या प्रत्येक सुुख-दुःखाची,त्या पानांवर लागलेली गोड चव आहे.ती कविता म्हणजेच माझे मन आहे,जे तुझ्याशिवाय कुठेच रमत नाही.तू वाचून घ्यावेस तिला एकदा,कारण तुझ्याविना मलाही जमत नाही.------------------------------रुसवा तुझा गोजिरवालाजणे तर तिचे रोजचेच आहे,पण तिचे रागावणे काही और असते.गोड हसण्यापेक्षाही जास्त ती,रागवून तोंड फुगवताना सुंदर दिसते.नजर जेव्हा ती तिरकी करते,आणि कपाळावर आठ्यांची रेघ उमटते.तेव्हा शांत चाललेली माझी दुनिया,एका क्षणात गरगर