एक प्रेम कथा अशीही.... भाग 2 भाग 1 वरून पुढे अभिमन्यू आणि अनिकेत हे दोघेही हॉस्टेलमध्ये ऍडमिशन करून घेतात. सुदैवाने त्यांना खोलीही एकच मिळते. ऋतुजा मॅडम तर तिथल्याच मुळच्या रहिवासी असतात पण थोडं स्वछंदी जीवन जगावं. आपल्या कॉलेजच्या दुनियेत मुक्तपणे वावरावं म्हणून तीसुद्धा होस्टेलला ऍडमिशन करून घेते आणि घरी काय सांगतेय मला शिस्त लावून घ्यायचीय.. खरंच शिस्तच ना. अभिमन्यू आणि अनिकेत चालतच कॉलेजला पोहचतात. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कॉलेजमध्ये थंडगार असे वातावरण होते. कॉलेजच्या मुख्य द्वारावर असलेल्या पिंपळाच्या झाडावरून टप.. टप. करत पाण्याचे तुषार अभिमन्यूच्या अंगाला स्पर्शून जात होते. थंडगार वाऱ्याची झुळूक मनाला तृप्त करीत होती.