एक प्रेमकथा अशीही.... - भाग 3

एक प्रेम कथा अशीही.... भाग 3 भाग 2 वरून पुढे.   बाहेर कसल्यातरी कर्कश्य आवाजाने अभिमन्यू भानावर आला. कॉफीचा कप तर केव्हाच थंड झाला होता. "छे ! साला हे जगही काही काळ एकांत भेटू देणार नाही वाटतं" अभिमन्यू स्वतःशीच म्हणाला. खिडकीच्या बाहेर असलेल्या जगाला तो न्याहाळत होता. " दुसऱ्याच्या जीवनात काय सुरु आहे.... ते कुठल्या टप्यावर येऊन पोहचलंय याच काही एक घेणं -देण नाही या जगाला. म्हणजे बघा ना रोजच सकाळी पुष्पे उमलणार, पेपर टाकणारा दूध टाकणारा रोजच येणार, तेच ते चित्रपट त्यांच त्या मालिका, तिच भेसूर वाटणारी दुपार.... काही वेळ झाल्यावर शांतपणे येणारी सायंकाळ आणि शेवटी या सगळ्याला संपवून निद्रिस्त करुण टाकणारी