प्रिय सोना ..आता बँकेतील माझे कोल्हापूरचे करिअर सुरू होणार याचा मला खूप आनंद झाला होता एखादी छोटीशी चांगली शाखा मिळून ऑफिसरचे काम करायचे.. आता नोकरी थोडीच राहिली होती आणि खरेच कोल्हापुरात गेल्या गेल्या मला एक छान छोटी शाखा ऑफिसर म्हणून मिळालीतुला सुद्धा बरे वाटले तू सुद्धा कोल्हापुरात परत काही नवीन सुरू करावे असे मी सुचवलेचार दिवस असे गेले तोवर मला दुसऱ्या लांबच्या शाखेत शाखा अधिकारी म्हणून दोन महिन्यासाठी तात्पुरते पोस्टिंग दिले मला या कामाचा अनुभव नव्हता पण मी नवीन शिकायला मिळेल म्हणून आणि थोडे दिवस तर हे पोस्टिंग आहे अशा विचाराने जॉइन झाले ही शाखा बरीच लांब होती आपल्या घरापासून बसची सोय पण ठीक नव्हती लगेच तू पुढे