एक प्रेमकथा अशीही.... - भाग 5

  • 132

एक प्रेम कथा अशीही... भाग 5   भाग 4 वरून पुढे   डोंगराच्या उजव्या बाजूला एक ग्रुप वनस्पतीचे वर्गीकरण  करीत होता तर डाव्या बाजूला दुसरा ग्रुप वर वनस्पतीचे निरीक्षण करण्याची जवाबदारी होती. अभिमन्यू आणि अवनी एक एक वनस्पतीला योग्यपणे न्याहाळत होते आणि त्याची योग्य माहिती डायरीत लिहत होते. वरुण सर्वांचे मोबाईल मध्ये फोटो टिपण्यात दंग होता. अनिकेत आणि ऋतुजा तिथे दिसणाऱ्या फुलांचे फ्लोरल रचना वहीत नमूद करीत होते.            दूरवरून ऋतुजाची नजर अभिमन्यू आणि अवनीवर पडली. हसत -हसत ते सर्व माहिती डायरीत लिहत होते आणि अतिशय जवळ येऊन काहीतरी हितगुज करीत होते. क्षणातच ऋतुजाच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. तिच्या कपाळावर