प्रिय सोना ..मी माझा राजीनामा तर पाठवून दिला एक महिना नोटीस पिरियड होता महिन्याभरात त्याची स्वीकृती होणार होती मी हळूहळू माझे काम आवरायला सुरुवात केली आपण ही खुर्ची सोडणेपूर्वी काम स्वच्छ असावे अशी माझी खटपट चालू होती पण नंतर पत्र आले वरिष्ठ ऑफिसकडूनपण राजीनामा स्वीकृत नाही झाला कारण काय तर म्हणे या शाखेत काम करायला कोणी तयारच नव्हते …परत मन नाराज झाले तू होतास मला सावरायला..जाऊदे आता इतके दिवस केलेस अजून थोडे दिवस कसेही जातील आता तर तुला कामाचा आवाका पण आलाय नंतर करू आपण मजा परत सुरू झाले कामात बुडून जाणे आता सुट्टी किंवा एक दोन दिवस रजा काढून आपल्या पुणे वाऱ्या सुरू झाल्या पिलू मोठे होत होते तीन महिन्याचे झाल्यावर तिचे बारसे