नियती पुन्हा हाक देईपर्यंत.. - 7

  • 291
  • 90

Chapter 7 – वाट पाहणं नाही... स्वतःला घडवणंत्या दिवसानंतर ताऱ्याने स्वतःला एक गोष्ट समजावून सांगितली होती—“मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही.”हे सत्य होतं.तिला त्याचा स्वभाव माहीत नव्हता.त्याला काय आवडतं, त्याची स्वप्नं काय आहेत, तो आयुष्याकडे कसं पाहतो—यापैकी काहीच तिला माहीत नव्हतं.तिने त्याच्याशी एकदाही बोललं नव्हतं.तरीही...तिच्या मनाने त्याच्यासाठी एक छोटासा कोपरा तयार केला होता.आणि त्या कोपऱ्यात ती त्याची कोणतीही अपेक्षा न ठेवता एक आठवण जपून ठेवत होती.---त्या सकाळी तारा आरशासमोर उभी होती.तिने स्वतःकडे पाहिलं."मी नेमकं काय करतेय?"तिला स्वतःचं हसू आलं.एखाद्या व्यक्तीला फक्त एकदा पाहिलं...आणि त्यानंतर सहा वर्षं त्याची आठवण मनात जपली.हे तिला स्वतःलाही कधी कधी अविश्वसनीय वाटायचं.पण मग तिच्या मनातून एक आवाज