सूरज आणि तनुजा. दोघेही एकाच आयटी कंपनीत वेगवेगळ्या टीममध्ये काम करत होते. सूरज दिसायला शांत, थोडा लाजाळू पण कामात अतिशय हुशार. तर तनुजा एकदम मनमिळाऊ, हसतमुख आणि प्रत्येकाला आपलीशी करणारी. त्यांची पहिली भेट कंपनीच्या एका प्रोजेक्ट पार्टीमध्ये झाली होती.पार्टीच्या गडबडीत एका कॉफीच्या कपवरून त्यांची टक्कर झाली आणि तिथूनच त्यांच्या ओळखीची सुरुवात झाली. सुरुवातीला फक्त "हाय-हॅलो" असणारे हे नाते हळूहळू चांगल्या मैत्रीत बदलले. दोघेही लंच ब्रेक एकत्र घेऊ लागले, कॉफी पिता पिता तासनतास गप्पा मारू लागले. सूरजच्या मनात तनुजाबद्दल भावना निर्माण होऊ लागल्या होत्या, पण तो नेहमी घाबरायचा की, जर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि तनुजाचे उत्तर 'नाही' आले, तर