असच ते लोकं दररोज सायकलिंग ला जात असत. एक दिवस आर्य ने देखील त्यांना बघितले होते. तो देखील येऊ लागला. वैदेहीने काही वाईट वाटून घेतले नाही. उलटून आनंदाने त्याचे स्वागत केले.श्रुष्टि देखील त्यांच्यात सामील झाली.वळण इथे येते.जेव्हा केव्हा ती यायची तेव्हा तेव्हा शिव तिची मस्ती करत असे.या मस्तीला वैदेही 'त्यांच्यात जवळीक वाढेल ' याचा अलार्म समजायची. शिव देखील थोडेफार वैदेहीकडे दुर्लक्ष करायचा. याचे तिला वाईट वाटू लागले;पण त्याने नंतर तिला त्या मस्तीत सामील केले म्हणून तिचे मन स्थिरावले.******शिवजयंती जवळ येत चालली होती. त्यांच्या सोसायटी मध्ये पहिल्यांदाच हा सोहळा साजरा होणार होता. सगळीकडे तयारीची लगबग सुरु होती.इथे मैत्रिणींच्या कट्ट्यात 'ए तू