निषादपर्व भाग २ पांथस्थाना अडवून, लुटमार करून उदरनिर्वाह करणाऱ्या दस्यूंबद्दल त्याला कमालीची घृणा वाटायची. आता दस्यू लुटारू यदुवंशीयांवर हल्ला करतील तेव्हा अर्जुनाच्या अमोघ शर वर्षावामुळे त्यांना चांगली अद्दल घडेल. अगदी अकल्पितपणे धनुर्विद्येचे एक अद्भुत गारूड आपल्याला पहावयास मिळेल. या विचारांनी त्याची उत्कंठा शिगेला पोचली. तथापि दस्यूंनी यादव समूहावर हल्ला केला, त्यानंतर अर्जुनाची झालेली केविलवाणी अवस्था पाहून त्याचा पुरता भ्रमनिरास झाला. हस्तिनापुराचा बलसंपन्न राजा, गुरूद्रोणाचा पट्ट शिष्य अर्जुन... महाभारत युद्धात अस्त्रविद्येच्या बळावर शत्रू पक्षाचा निष्पात करणारा श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन...! त्याची दुःस्थिती पाहून हळहळणारा निषाद, द्रव्य आणि नारींचे अपहरण करून विजायोन्मादाने गर्जना करीत मार्गस्थ होणारा दस्यू समूह पाहून आपल्या व्रतापासून