वाईट काळ माणसाला सर्व काही शिकवून जातो.जेव्हा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर वाईट परिस्थिती येते, तेव्हा नकळत आपण त्याच्यावर हसतो. मनात विचार येतो की, “तो प्रयत्न करत नसेल… त्याच्यामध्येच काहीतरी कमी असेल…” पण जेव्हा तीच परिस्थिती आपल्या आयुष्यात येते, तेव्हा कळतं की परिस्थिती आपल्या विरोधात गेल्यावर सगळं किती कठीण होतं.आपण सर्व काही करून पाहतो, पण तरीही प्रत्येक ठिकाणी अपयश येतं. एकामागून एक दरवाजे बंद होत जातात. कुठूनही मदतीचा हात मिळत नाही. तेव्हा जाणवतं की, दुसऱ्याच्या परिस्थितीवर हसणं किंवा त्याच्या अपयशाची टिंगल करणं किती चुकीचं आहे.म्हणून कोणाच्याही परिस्थितीवर, त्याच्या अपयशावर कधीही हसू नये किंवा त्याची टिंगल करू नये. कारण आज जी परिस्थिती त्याच्यावर