खरचं देव!....कि अजून काही…!!

  • 2.7k
  • 1k

सकाळी सकाळी साखरझोपेत असतानाच विवेकचा फोन आला. मोबाईलची रिंगटोन जरी मनाला भावत असली तरी त्यावेळेस ती जणू कर्कश वाटायला लागली.झोपमोड झाल्याने मी काही अनुत्साहातच मोबाईल हाती घेतला आणि डोळे चोळत मोबाईल स्क्रीनकडे बघितले. विवेकचं नाव दिसताच थोडा हबकलो. कारण एवढ्या सकाळी काहीतरी मोठं कारण असल्याशिवाय हा फोन करणार नाही हे तर मला माहीत होतच.फोन उचलत मी “हॅलो, बोल आज सकाळी सकाळी कॉल केला, ठीक तर आहेस ना!” असे एकदम बोललो. तर लगेच अगदी उत्साहात विवेकचा आवाज आला, “अरे मी ठीक आहे, पटकन तयारी करून कृतिकाच्या घरी ये! सर्वजण पोहोचत आहेत, आणि हो, घरी नाश्ता नको करू, मी कृतिकाच्या मम्मीला सांगितलंय