द्वितिय महायुद्ध - भाग 3

नोव्हेंबर १९२३. जर्मनीमधील बावरिया (Bavaria) प्रांताची राजधानी असलेले 'म्युनिक' (Munich) शहर एका मोठ्या राजकीय आणि सामाजिक वादळाच्या उंबरठ्यावर उभे होते. पहिल्या महायुद्धातील पराभव आणि व्हर्सायच्या तहामुळे लादण्यात आलेल्या अवाढव्य दंडामुळे जर्मनीची अर्थव्यवस्था अक्षरशः रसातळाला गेली होती.या काळात जर्मनीत 'हायपरइन्फ्लेशन' (Hyperinflation) म्हणजेच महागाईने असा उच्चांक गाठला होता, ज्याची इतिहासात नोंद नाही. कागदी पैशाची किंमत शून्य झाली होती. एक पावाचा तुकडा घेण्यासाठी लोकांना अब्जावधी 'मार्क्स' (जर्मन चलन) मोजावे लागत होते. लोक बॅगांमध्ये पैसे भरून दुकानात जात होते. कधीकधी लोक चुलीत लाकडे जाळण्याऐवजी पैशांचे बंडल जाळत होते, कारण लाकूड पैशांपेक्षा महाग झाले होते. या भयंकर परिस्थितीमुळे संपूर्ण जर्मन जनतेच्या मनात स्वतःच्या लोकशाही सरकारविरुद्ध