भाग १: पहिली भेट… आणि पहिल्याच क्षणी नफरत! प्रसंग: मुंबईचा पाऊस आणि हाय-प्रोफाइल पार्टीरात्रीची वेळ होती. मुंबईत मुसळधार पाऊस पडत होता. एका आलिशान बिझनेस हॉटेलमध्ये अरोरा फॅमिलीच्या एका महत्त्वाच्या बिझनेस डीलनिमित्त ग्रँड पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये मोठ्या उद्योजकांची आणि सेलिब्रिटींची गर्दी जमली होती.आरोही आपल्या वडिलांसोबत या पार्टीत आली होती, पण तिला या बिझनेसच्या जगामध्ये किंवा असल्या पार्टीमध्ये अजिबात रस नव्हता. ती शांतपणे एका कोपऱ्यात उभी राहून आजूबाजूच्या लोकांचे नाटक बघत होती. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट बोरिंग फिलिंग्स दिसत होत्या.तेवढ्यात हॉटेलच्या मुख्य दरवाज्यातून रुद्र राजवर्धनची एन्ट्री झाली.रुद्रचं नाव ऐकताच संपूर्ण हॉलमध्ये एक वेगळंच वातावरण तयार झालं. सगळेजण त्याला आदराने वाट करून देऊ