आता कुठे निघाला आहेस तू.... अंशुल आवरून खाली आला तर शांताई ने त्याला विचारल...आता झालय ना तुझ्या मनासारखं मोठी आई..आणि मला खूप सारी कामे आहेत... असंच घरात नाही बसून राहू शकत मी.... रागच आलेला त्याला असं टोकल म्हणून.....शब्दांवर मर्यादा ठेवा चिरंजीव.... नुकतेच आत आलेले अनंतराव बोलले तसा त्याने सुस्कारा सोडला..... असही घरात गेस्ट होते... त्यामुळे इथे काही इशू क्रिएट नव्हता करायचा त्याला ....त्यामुळे शांतपणे तो बाहेर निघून गेला...आता पुढे...अनंतरावांची पत्नी वसुंधरा.. मागच्या चार-पाच वर्षांमध्ये हार्ट अटॅक मुळे गेल्या.... सुरुवातीपासूनच ते आणि त्यांचे मोठे भाऊ आदिश राव एकत्र राहिलेले.... वसुंधरा आणि शांताईंचं पण तसं बऱ्यापैकी जमायचं... शेवटी घर होत.... भांड्याला भांड