एक प्रेमकथा अशीही.... - भाग 6

  • 3k
  • 1.2k

एक प्रेम कथा अशीही..... भाग 6 भाग 5 वरून पुढे   खिडकीच्या काचेवर साचलेल्या थेंबाला ऋतुजाने हळुवारपणे स्पर्श केला. " किती सुंदर असतात ना हे थेंब काही क्षण या काचेवर व्यतीत करतात आणि दुसऱ्याच क्षणी ते काचेवरून घसरुन जमिनीत विलीन होतात पण जमिनीशी एकरूप होतांना त्या थेंबाना काचेची आठवण येत असेल का? " ऋतुजा स्वतःशीच म्हणाली. या  प्रश्नामुळेच कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून ते वनस्पतीशास्त्राच्या सहलीपर्यंतचा संपूर्ण आठवणींचा उजाळा झाला होता. त्याची ती पहिली नजर... पहिल्या नजरेतच मनाला आवडलेला तो, स्मितहास्याचा लपंडाप, त्याच्यासोबत केलेला पहिला कपल डान्स सर्व... सर्व.. काही परत अनुभवतेय असेच तिला भासत होते.  " काय झालं गं ऋतू?  काही दिवसापासून बघतेय खूप