एक प्रेम कथा अशीही.... भाग 7 बाहेर असलेल्या पक्षांच्या किलबिलाटाने अभिमन्यूचे डोळे उघडले. खिडकीतून उन्हाचा एक छोटासा कवडसा त्याच्या पलंगावर येऊन बसला होता जणू तो ही त्याला निद्रेतून जागे होण्यास सुचवीत होता. अभिमन्यूने घडाळ्यात पहिले. सकाळचे 9 वाजले होते. एक लांब जांभई देऊन आळस घालविण्याचा तो अपुरा प्रयत्न करीत होता. रविवार असल्यामुळे आज त्याची मनसोक्तपणे झोप झाली होती आणि आता वेध लागला होता एका गरमा गरम चहाच्या कपाचा. डोळे चोळत त्याने सर्व आवरायला सुरवात केली. सकाळची सर्व आवरा आवर करून अनिकेत आणि अभिमन्यू होस्टेलच्या बाजूला असलेल्या टपरीवर चहा प्यायला निघाले. रविवार असल्यामुळे आज कसलीही घाई नव्हती. नेहमीचा वर्दळीचा