चांदने तिच्याबद्दल बोलताच, आजूबाजूला जमलेली सर्व मुले-मुली नैनकडे पाहू लागली. "काय? तू काय बोलतेयस हे?" समोर उभी असलेली एक मुलगी वैतागून म्हणाली."हो, मी अगदी खरं सांगतेय. ही माझी मोलकरीण आहे आणि माझ्या प्रत्येक हुकुमाचे पालन करते. ही इथे कॉलेजमध्ये शिकायला आलेली नाही, तर माझी कामे करण्यासाठी आली आहे," चांदने आत्मविश्वासाने उत्तर दिले.हे सगळे काही वेळ शांतपणे ऐकत असलेला रियांश पुढे आला आणि म्हणाला, "म्हणजे तुझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, ही मुलगी आपण सांगू ते सगळे ऐकेल? कसलाही विरोध न करता?""हो," चांदने ठामपणे सांगितले."व्यवचार विचार करून बोल, मिस चांदणी. जर असं झालं नाही, तर या कॉलेजमध्ये जगणं तुझ्यासाठी खूप कठीण