"नौटंकी, हिला बरोबर माहिती आहे कि मी तिला भलं मोठं lecture देईल ह्यावरून, म्हणून अशी नाटकं करतेय " गालातच ती हसली."चला आता बाहेर जायचं आहे. खरं सांगायचं गेले तर धास्ती वाढतेय हृदयात. माझं काय होणार आहे माहित नाही." निश्वास टाकत ती बाहेर गेली.दोघीही बिल्डिंगच्या कंपाऊंड मध्ये पधारल्या. दोघीही एकी मेकीला बघून थक्क होत्या.यधण्या ने ताजा हिरव्या रंगाची नऊवारी नेहसली होती,काठ चंदेरी आणि त्याला राणी पिंक ची बॉर्डर. गळा मस्त सोनेरी ठुशी आणि आणि नाजूक पेंडंट ने सजलेलं. नाकाशी प्रेस वाली नथ,कानात छोटे सोनेरी झूमके, हातात हिरव्या बांगड्या आणि चेहऱ्यावर ती चंचलता! नजरेत आपल्या bestie प्रति माया.तिथेच दुसरीकडे वैदेही भगव्या रंगाची,प्रुशियन