वैदेही हॉल च्या आत प्रवेशली. शिव ची आकृती त्या गर्दीत देखील लख्ख चमकून येत होती. त्याने अबोली रंगाचा रेशमी कुर्ता घातला होता.फेटा बांधून घेण्यासाठी तिथे उभा होता. तिला तो पाठमोरा होता.त्याच्या आकर्षक पाठ कडे बघताना वैदेहीला आनंद होत होता."चेहऱ्यासोबत त्याची पाठ देखील किती आकर्षक वाटते हो."ती हलकीच हसली.पण तिचं हृदय मात्र मॅरेथॉन धावत होतं..."मी कशी सामोरे जाणार आहे त्याला, तत, पप झालं तर??त्याला मी nervous आहे हे कळलं तर?शांत वैदेही शांत बी पॉसिटीव्ह "ती कोमल पावलांनी त्याच्याकडे वळली. पायातील पैंजणांचा कोमल 'छुम छुम'त्या हॉल मध्ये घुमला.इथं शिवच्या मनात."अरे,आज वैदेही ताई पाडेकर आल्या नाहीत का?कमाल आहे.."वैदेहीच्या पैंजणांचा आवाज आल्यावर "एवढे कोमल,पण