अपराधबोध... - 1

अस्वीकरणही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कथेत आलेली पात्रे, घटना, ठिकाणे, संस्था आणि प्रसंग हे लेखकाच्या कल्पनेतून निर्माण केलेले आहेत. कोणत्याही वास्तविक व्यक्ती, घटनेशी किंवा संस्थेशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.कथेतील काही घटना व तपशील हे केवळ कथानकाच्या गरजेनुसार मांडले आहेत. त्यांचा वास्तव जीवनाशी संबंध जोडू नये.ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिलेली आहे.----------------.‎प्रकरण १ : हत्या‎‎१९८०, खंडाळा, महाराष्ट्र.‎‎जोरदार पाऊस नुकताच थांबला होता.‎‎पहाटेचे साडेपाच वाजले होते. आकाश अजूनही ढगांनी भरलेले होते आणि वातावरणात पावसाचा गारवा दाटून राहिला होता. रस्त्याच्या कडेला साचलेल्या पाण्यातून एक शेतकरी सावकाश पुढे चालत होता. एका हातात कुडाळ आणि दुसऱ्या हातात कंदील होता.‎‎दररोजप्रमाणे तो शेताकडे निघाला होता.‎‎समर्थ निवासजवळ