निषाद पर्व - भाग 4

(16)
  • 1.9k
  • 1
  • 609

निषादपर्व  भाग ४"सकृत् दर्शनी, पूर्व परिचय नाही अशी धारणा असतानाही मला तुच्छ लेखीत वनचर म्हणून तू संबोधिलेस. पण मागाहून माझ्या शरसंधानाचा प्रत्यय आल्यावर मात्र त्याच वनचराला दांभिकतेने गुरूबंधू म्हणून संबोधिण्याचे तुझे धारिष्ट्य, तुझ्या अंगी मुरलेल्या कुटील राजनीतीला अन् सर्पफणेप्रमाणे केवळ दिखावू अशा तुझ्या विनयी वृत्तीला शोभणारे आहे! इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर, आयुष्याच्या उतरणीला लागल्यामुळे, असहाय्य अगतिक झाल्यामुळे तरी मला भेटल्यावर-निदान माझी ओळख पटल्यावर तरी पश्चात्तापाचे दोन कामचलाऊ शब्दही तू उद्‌गारले नाहीस. उलट अंगुष्ठरुपाने जीवन सर्वस्व गमावल्यावरही मी अद्यापि जिवंत आहे, एवढेच नव्हे तर माझे शरसंधान कौशल्यही शाबूत आहे, ते खंडित झाले नाही या बद्दल खदखदणारे वैषम्य... शिष्टाचार म्हणून तरी कृतक आनंद