भाग 1 वरून पुढे " सत्यमेव जयते..सत्याचाच नेहमी विजय होवो. सत्यप्रकाशाचे किरण या समग्र विश्वात पसरून सर्वत्र शांतता नांदो " प्रतापरावांच्या मनाच्या सप्तद्वारात पडघमांचे कटू सत्य बोल घुमत होते. काळाच्या पाठलागावर असतांना नेहमीच त्यांचा सत्यासाठी प्रदीर्घ असा संघर्ष राहिला होता. पण आता परिस्थिती जरा वेगळी होती. प्रतापराव देसाई हे रिटायर्ड IPS अधिकारी होते. अतिशय धिप्पाड , उंचपुरे ,दिसायला साधारणतः गहूवर्णीय रंग ,लांबसडक नाक ,वाढलेल्या दाढीमिश्या कुणाचंही लक्ष्य वेधून घेईल असं मजबूत व्यक्तिमत्व .आपल्या नौकरीच्या किंवा जनसेवेच्या कारकिर्दीत प्रतापराव देसाई हे नाव ऐकतांच कितीतरी गुन्हेगाराच्या काळजात धडकी भरत असे. याला कारण म्हणजे कुठेही तडजोड नाही. वारा वाहायला कधीच कुणाच्या परवानगीची