"Bestfriend"चे वजन एवढे हलके असते का?? कि कधी ते नातेच फुलले नव्हते??"या एका प्रश्नाने वैदेहीच्या हृदयात अनामिक भीती जागृत झाली.."माझा फक्त वापर करण्यात आलाय का?ज्या वयक्तीवर मनापासून विश्वास ठेवला तिच व्यक्ती माझा वापर तर करत नाही आहे ना.."डोळ्याशी अश्रू तरळले."सगळे माझा वापरच का करतात?? मी एवढी मूर्ख आहे का कि कोणाच्याही जाळ्यात लगेच अडकते."तिचा आवाज कातरला.मोबाईल वर शिवचा मेसेज आला.."सिद्धिशी बोलत होतास का?"भलेही तो मेसेज होता पण तिच्या मनाने मात्र कोरडा प्रश्न विचारला होता."हो. तिच्याशी बोलत होतो. तुला कसं कळलं?"त्याने गमतीत विचारलं."जेव्हा चॅट ला फुल इग्नोर करून गायब झालास ना, तेव्हाच कळलं " स्वतःची वेदना सांगण्याचा प्रयत्न तिने केला."ओह अच्छा,