नाते जन्मापलिकडचे - भाग 12

"Well i already knew about it"वैदेही खोटे बोलत नव्हती ह्याची खात्री शिव ला पटली."Oh, nice.तुला सांगू, जेव्हा केव्हा ती येतेना.. तेव्हा मी एका वेगळ्याच दुनियेत हरवून जातो गं.. ती गर्दीत पण उजळून दिसते..""Ohh""मी एके दिवशी माझी बाईक घेऊन फिरत होतो.. संध्याकाळची वेळ होती, गर्दीची वेळ होती.. मी चौकत पोहोचलो तेव्हा ती समोरून येत होती तिच्या स्कूटर वर..आता मला एक सांग एवढ्या गर्दीत आपल्याला कोणी पटकन स्पॉट होईल तरी का? त्याचं उत्तर आहे नाही, पण ती त्या गर्दीत पण चमकून दिसली.. तिला लगेच स्पॉट केलं मी.... नेमका तेव्हाच मला असे वाटू लागेल कि वेळ मंदावला आहे.. एका क्षणासाठी मी या भ्रमात