Mr. Money - भाग 11

(32)
  • 909
  • 321

क्लिनिकच्या त्या पांढऱ्याशुभ्र आयसीयू (ICU) खोलीत औषधांचा उग्र वास पसरला होता. बाहेर सकाळचे कोवळे ऊन पडू लागले होते. बेडवर मिस्टर मनी म्हणजेच रुद्रवीर महाडिक बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याच्या अंगावर अनेक पट्ट्या बांधलेल्या होत्या. मॉनिटरचा तो संथ 'बीप... बीप...' आवाज खोलीतील शांतता भंग करत होता. हळूहळू मनीच्या शरीरात उष्णता जाणवू लागली. त्याच्या डोळ्यांच्या पापड्या हलल्या. त्याने अत्यंत कष्टाने आपले निळे डोळे उघडले.समोरचे दृश्य सुरुवातीला त्याला अंधुक दिसले. त्याने डोके हलवण्याचा प्रयत्न केला, पण कपाळावर तीव्र वेदना झाली. त्याने पाहिले की त्याच्या हाताला सलाईन आणि रक्ताची नळी जोडलेली होती. जुन्या आठवणी त्याच्या मेंदूत विजेसारख्या चमचमल्या—तो रक्ताळलेला रस्ता, शत्रूंचे शूटर्स, आणि... एक