निषाद पर्व - भाग 5

  • 102
  • 1

             निषाद पर्व भाग५ आम्हां निषादांची बोली म्हणजे पैशाची! नियमादिंचेकसलेही बंधन नसलेली आम्हा निषादांची ती आदिम बोली! आतानगरजनांशी क्वचित येणाऱ्या संपर्कातून गीर्वाण भारती-देववाणी मधील काही शब्द मला अवगत आहेत इतकेच. त्यातहीआश्चर्याचा काही भाग नाही की कसले रहस्यही नाही. अर्जुनाभाषा हा तर मानवाचा सहजाविष्कार...तो विशिष्टजनसमूहापुरता मर्यादित कसा राहणार? त्यामुळे कदाचितमाझ्या बोलीने तिच्या मर्यादा ओलांडिल्या असणे संभवते.""पण अर्जुना! धर्माज्ञाओलांडून, जनक्षोभ पत्करून आम्हा निषादांना देववाणी,मंत्रविद्या अन् अस्त्रविद्या शिकवायला तरी कोण गुरू धजावेल?खेरीज एकदा गुरू द्रोणांनी मला शिष्यत्व नाकारील्यावर कोणाज्ञानवंताचा अनुग्रह प्राप्त होईल अशी अपेक्षा तरी मी कशी बरे करू धजावेन?वाक्पटू अर्जुना, वनामध्ये विहारकरणारे म्हणून आम्ही वनचर अशी उपाधी देववाणी पारंगत असलेला तू...मोठ्या मानभावीपणाने देत