फ्लाईट: ८०४ - 2

  • 243
  • 90

प्रकरण २: विज्ञानाचा चक्रव्यूहसमरजीतच्या हातातून ती प्रवाशांची यादी पडली. पाण्याचे थेंब त्या कागदावर पडत होते, पण त्याचे डोळे गोठले होते. 'आनंद सिंग... सीट नंबर १२-बी.' हा तोच चेहरा होता, जो त्याने लहानपणापासून घरातल्या एका जुन्या, अंधुक पडलेल्या फोटो फ्रेममध्ये पाहिला होता. ज्या वडिलांच्या कल्पनेवर तो मोठा झाला, ज्यांचे अस्तित्व एका गूढ विमान अपघातात संपले असे त्याला सांगितले गेले होते, ते आज अचानक या वादळी रात्री जिवंत परत आले होते. आणि तेही एका अशा विमानातून, ज्याचे अस्तित्वच काळाच्या पडद्याआड लपले होते."सर? काय झालं सर? तुम्ही ठीक आहात ना?" सहाय्यक विक्रमने काळजीने विचारले.पण समरजीतला आता कोणताही आवाज ऐकू येत नव्हता. त्याचा श्वास अडकला होता.