फ्लाईट: ८०४ - 3

  • 123

प्रकरण ३------------------कालचक्रात उडी एटीसी रूमच्या फुटलेल्या काचेच्या खिडक्यांमधून पावसाचा थंड वारा आत येत होता, पण आतलं वातावरण गोळ्यांच्या ठिणग्यांनी आणि बारुदाच्या वासाने होरपळून निघालं होतं. संपूर्ण विमानतळाची वीज गायब झाल्यामुळे फक्त विजांच्या अंधुक प्रकाशातच शत्रूंच्या हालचाली दिसत होत्या. काळे कपडे घातलेले हल्लेखोर अत्यंत क्रूरपणे पुढे सरकत होते. त्यांच्या ऑटोमॅटिक गन्समधून निघणाऱ्या गोळ्या भिंतींना आणि कॉम्प्युटर स्क्रीन्सना छिन्नविच्छिन्न करत होत्या."विक्रम! उजव्या बाजूने कव्हर घे!" समरजीत अंधारातच ओरडला. त्याने एका खांबाचा आडोसा घेतला आणि समोरून येणाऱ्या एका हल्लेखोराच्या डोक्यात अचूक गोळी झाडली. तो हल्लेखोर तिथेच कोसळला.दुसऱ्या बाजूला, डॉ. फिनिक्स एका मोठ्या लोखंडी कपाटाच्या मागे जमिनीवर बसले होते. त्यांच्या छातीशी त्यांनी ती जुनी चामड्याची