प्रकरण ४----------------३५ वर्षांपूर्वीगोळीचा आवाज पावसाच्या कडकडाटापेक्षाही जास्त भयानक होता. समरजीत विमानाचा दरवाजा पकडून उभा होता. गोळी त्याच्या उजव्या खांद्याला घासून गेली होती, ज्यातून रक्ताची धार वाहू लागली होती. त्याच्या पाठीवर रक्ताचा डाग पसरू लागला होता. समरजीतने वेदनेने दात ओठ खाल्ले, पण तो पडला नाही. त्याने मागे वळून न पाहता विमानाचा मुख्य आपत्कालीन दरवाजा आतून ओढला आणि तो थेट कॉकपिटच्या दिशेने धावला.त्याच्या मागेच, ६० वर्षांचे वृद्ध डॉ. फिनिक्स धावत कॉकपिटमध्ये आले. विमानातील सर्व प्रवासी आणि मूळ वैमानिक विमानतळाच्या तळघरात सुरक्षित होते, त्यामुळे आता हे रिकामे विमान हवेत झेपावण्याची पूर्ण जबाबदारी डॉ. फिनिक्स यांच्यावर होती. त्यांनी हातातील काळ्या यंत्राची मुख्य केबल विमानातील