निषाद पर्व - भाग 7

  • 129

             निषाद पर्व भाग ७  ज्यांच्याकडे पाहून आपल्या जवळच्या कातीव कोरीव इंद्रधनुष्यी रंग छटा असलेल्या धनुष्यांशी अन् नाजूक सुबक आखीव रेखीव बाणांशी तुलना करीत तुम्ही नाके मुरडून कुचेष्टा केलीत... तो कामठा नी ते तीरसुद्धा मी स्वतः बनविलेले होते. शस्त्रशाळेतील पोटार्थी कारागिरांनी घडविलेली नक्षीदार धनुष्ये आणि आखीव रेखीव बाण आयते वापरणाऱ्या तुला क्षत्रियालाया मागचे तत्व तरी कसे कळावे? धनुष्य हे स्त्री सारखे आहे. त्याच्या वरपांगी सौंदर्यावरुन त्याचे श्रेष्ठत्व ठरत नसते. ज्या धनुर्धराला तीरकामठा स्वतः बनविता येत नाही, तो शरसंधानातले कौशल्य कसे काय हस्तगत करणार...?""तिरकामठा स्वतःबनविल्यावरच लक्ष्यवेधातले खरे इंगित समजते. 'धनुर्विद्यारहस्या' सारख्या तुझ्या जडजंबाल ग्रंथराजांच्या वाटेलाही न गेलेला मी अक्षर शत्रू निषाद! पण तिरकामठ्याचे माझे