रानवाडीचं अधूरं प्रेम! उंचच उंच हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेलं ते एक छोटंसं आणि देखणं गाव... रानवाडी. याच रानवाडी गावात एक साधं, सुटसुटीत आणि हसतं-खेळतं लहानसं कुटुंब राहायचं. घराभोवती शेत, गोठ्यात बांधलेली गुरं आणि माणसं एकदम मायेची.याच कुटुंबाचा जीव आणि घराचा सगळ्यात लाडका मुलगा म्हणजे आपला परश्या! स्वभावाने रगेल, बोलण्यात हुशार आणि मित्रांसाठी नेहमी आघाडीवर असणारा. परश्या आता इयत्ता १० वीच्या वर्गात नुकताच गेला होता.परश्याचे वडील शेतकरी होते, जे दिवस-रात्र काळ्या मातीत घाम गाळून आपल्या सं