निषाद पर्व - भाग 8

  • 564
  • 201

             निषाद पर्व भाग ८  एकलव्य भूमीवर आसनस्थ झाला. दोन्ही पायांच्या अंगठ्यांनी वेत्र काष्टावर पकड घेऊन त्याने ते जमिनी समांतर स्थिर केले. दोन्ही ओठांमध्ये धरून त्यावर तीर सज्ज केला.मग ओठानीच प्रत्यंचेसह तीरावर घट्ट पकड घेत त्याने प्रत्यंचा ताणली अन् मानेला हिसका दिला.यावेळीथरथरणाऱ्या प्रत्यंचेने सर्प फुत्काराप्रमाणे ध्वनी निर्माण केला. तो ऐकून एखादा बलिष्ट नागराज तर समीप आला नाही ना या भीतीने पार्थ दचकून मागे सरकला. या वेळचा तीर शरचक्रात भूमीलगत रिंगण घेऊ लागला. त्याचा वेग एवढा तीव्र की शरचक्रातील इतर तीरांपूर्वीच त्याचे मंडल पूर्ण होऊ लागले.यावेळी शरचक्रामधील मंदगती तीर बदलताना एकलव्याने डावा हात, एक हात, एक पाय, यांचा वापर करूनही तीर सोडून