Mr. Money - भाग 12

(15)
  • 948
  • 423

मिस्टर मनी - भाग १२: दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक पावणेनऊ वाजले होते. दक्षिण मुंबईतील मिस्टर मनीच्या त्या महाकाय, गगनचुंबी इमारतीच्या मुख्य काचेच्या प्रवेशद्वारासमोर एक पांढरी टॅक्सी येऊन थांबली. त्या टॅक्सीमधून तन्वी खाली उतरली. तिने हलक्या निळ्या रंगाचा एक साधा कुर्तात आणि पांढरी लेगिंग्स घातली होती. तिचे केस पाठीवर मोकळे सुटलेले होते आणि चेहऱ्यावर कोणताही मेकअप नव्हता. तिच्या त्या साधेपणामध्ये एक वेगळाच राजबिंडा स्वाभिमान दिसत होता.तिने समोर पाहिल्यास ती ७० मजली महाकाय इमारत आभाळाला भिडल्यासारखी वाटत होती. इमारतीच्या चारी बाजूंनी काळ्या सूटमध्ये सज्ज असलेले आणि कानावर कम्युनिकेटर लावलेले मनीचे वैयक्तिक रक्षक कडक पहारा देत होते. तन्वीने एक दीर्घ श्वास घेतला. काल रात्रीपर्यंत