"मी कोण आहे!!??? माझ्यात काय आहे??"काही क्षण ती त्या शब्दांकडेच बघत बसली. तिची तंद्री आईच्या ओरड्याने मोडली गेली.."ए बाई!! गॅस वर ठेवलेल्या दुधाकडे लक्ष दे जरा!"ती डचकली."ह-हा हा देते "स्वतःच्या डोक्यावर टपली मारत ती म्हणाली.दिवस सरत गेले.एके दिवशी पुन्हा शिवचा मेसेज आला."वैदेही "पण ती ऑफलाईन होती. शिवच्या मनात विचारांचा काहूर माजला."यार ऑनलाईन ये ना पटकन. खूप महत्तवाचं सांगायचं आहे... अरे!मी का विसरतो मी कोण आहे. मी तिला ऑनलाईन आणू शकतो कि!"त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य उमटलं. त्याने त्याच्या बाजूलाच असलेल्या त्या माणसाला अदृश्य शक्तिकडे बघितलं. "बॉस, प्लीज !"मंद हसत त्या शक्तीने मान डोलावली. "मी नाही म्हणलो तरी तू काय ऐकणार आहेस का