तात्याचे किस्से(अस्सल वऱ्हाडी विनोदी कथासंग्रह) तात्याचे किस्से' हा अस्सल वऱ्हाडी भाषेतील निखळ आणि खळखळून हसवणाऱ्या विनोदी कथांचा एक भन्नाट संग्रह आहे. गावात वय सत्तर गाठलेले पण अंगातील खोडकरपणा आणि रग कायम असलेले 'तात्या' म्हणजे अख्ख्या गावचा एक चालता-बोलता नमुना! स्वतःला अती-शहाणे समजणारे तात्या जेव्हा-जेव्हा गावात आपली अक्कल पाजळायला जातात, तेव्हा-तेव्हा हास्याचा मोठा कल्लोळ उडतो. स्मार्टफोनच्या मेसेजचा राडा असो, बँकेतील एटीएम मशीनशी घातलेली हुज्जत, शेतातला सोलर पंप, नाटकातील 'सैरंध्री'चा फजितवाडा, बैल बाजारातील गोंधळ की तमाशातील चावट डोळा—तात्यांचे प्रत्येक उपद्व्याप वाचकाला पोट धरून हसायला भाग पाडतात.