तात्याचे किस्से(अस्सल वऱ्हाडी विनोदी कथासंग्रह)अनुक्रमणिकातात्या, 'इसमार्ट' फोन आणि म्हातारीचं धोतर!तात्या आणि बँकेतली 'नोटंकी' मशीन!तात्या आणि शेतातला 'सुर्यफुला'चा पंप!तात्या आणि चावट ब्युटी पार्लरचा राडा!तात्या आणि नाटकातील 'सैरंध्री'चा फजितवाडा!तात्या, लग्नाची मध्यस्थी अन् म्हातारीचा चष्मा!तात्या गेला बैल बाजारात!तात्या आणि डॉक्टरचा बीपी तपासणीचा तगादा!तात्या, कोंबड्याची भाजी अन् 'कोंबडा-पकड' मोहीम!तात्या, पोराची 'बुलेट' अन् भन्नाट उड्डाण!तात्याले लागली 'पुनरलग्नाची' चाहूल!तात्या हरवले... अख्खं गाव शोधाशोध करत फिरलं!तात्या आणि टाळक्यावरचं 'टॉवर'!तात्या, चावट डोळा अन् तमाशाची 'नाचणारी बाई'!तात्या गेला परसाकडं अन् विंचवाची नांगी!१. तात्या, 'इसमार्ट' फोन आणि म्हातारीचं धोतर!गावात तात्या म्हंजे एक चालता-बोलता नमुना! वय वर्षं सत्तरच्या घरात गेलं व्हतं, पण अंगातली रग अजून जिरली नव्हती. नाकावर भिंगासारखा जाड चष्मा,