"काय?""कळेल "त्यावर शक्तीने उत्तर दिले.शिवने भुवयी आक्रसली.त्याने मेसेज type केला."तुला का वाटतंय असं? आणि तुला काय माहित किती खरं ते?""शिव... हे बघ तू जेव्हा मला सांगितलं ना, कि तुला वेदिका आवडते.. तेव्हाच मला माझं मन सांगून गेलं. तुम्ही दोघ कधीच एकत्र येऊ शकत नाही. माझ्या मनाने तुम्हाला सोबत चित्रित करायचा प्रयत्न केला होता, पण त्याने स्पष्ट नकार दिला, आणि सरळ सांगितलं 'हे जोडी होणे नाही' ""वैदेही तुला वाटतं का मी ह्यावर विश्वास ठेवेल. तू माझ्यावर प्रेम करतेस म्हणून तुला आवडणार नाही कोणासोबत येणं. त्या मुळे तुला तुझं मन भ्रमात ठेवतंय कि काही नाही होणार आमचं."मागून ती शक्ती हसली "मला वाटलंच