निषाद पर्व भाग ९ साक्षात योगेश्वराच्या मुखी शोभावी अशी शब्दकळा आणि त्याने दाखविलेल्या विश्वरूप दर्शनाची उपमा सार्थ ठरावी असे शरसंधान कौशल्य यामुळे पार्थ भारावून गेला. त्याचे मस्तक आदराने झुकले.आवाजात अतीव मार्दव आणीत तो म्हणाला,"निषादराज, हा इंद्रप्रस्थाचा सत्ताधारी, नरपुंगव, वीरशिरोमणी, श्रेष्ठ धनुर्धर आणि श्रीकृष्णाचा परमभक्त पार्थ तुमच्यापुढे नतमस्तक झाला आहे. आपण उदारमनस्क असून पूर्णप्रतापी सूर्यासमान स्वयंप्रकाशी असून वेद वाणीच्या तोडीचे माधुर्य अन् आशय तुमच्या वाणीमध्ये आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचे हे नव्याने दर्शन झाल्यामुळे माझे अष्ट सात्विक भाव जागृत झालेआहेत. मी आपणावर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन व्हावे यास्तव आपण द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे.मात्र तत्पूर्वी या दासाची एक नम्र