दैत्य - भाग 1

  • 132

दैत्य ही कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेत उल्लेख केलेली पात्र, नावे, घटना, स्थळ ह्यांचा वास्तवाशी कुठेही संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. कथेत वर्णन केलेल्या घटना, पात्रे आणि प्रसंग हे काल्पनिक असून त्यांचा उद्देश केवळ मनोरंजन आणि सामाजिक वास्तवातील काही पैलूंवर प्रकाश टाकणे हा आहे.-------------------------------------------------------------------------------भाग १रात्रीचे फक्त 8.30 वाजले होते. तरीही रात्र गडद होती…आकाशात ढग दाटले होते.चंद्र लपला होता…शहराच्या काही गल्ल्या नेहमीप्रमाणे अंधारातच जगत होत्या. दिवसभर असलेली उन्हाची काहीली अजूनही जाणवत होती. आणि अचानक तापलेल्या जमिनीवर काही थेंब टप टप पडले. आणि काही कळायच्या आत पावसाच्या सरी अचानक कोसळायला लागल्या.चिटपाखरू नसलेली ती अरुंद गल्ली... गल्लीच्या टोकाशी नगरपालिकेचा एक स्ट्रीटलॅम्प ... ज्याचा